दैवत छत्रपती
दैवत छत्रपती
1 min
300
शिवनेरीच्या क्षितिजावरती
काळरात्र ती चिरून सारी
एक तेजोमय सूर्य जन्मला
डंका वाजला कडेकपारी।। १।।
निधडी छाती, काळीज वाघाचे
मुघली आतंक चिरफाडून काढले
मूठभर मावळे घेऊन सोबती
शून्यातून ' स्वराज्य' निर्मिले।। २।।
'सर्वधर्म सहिष्णूता' अंगी
परस्री मातेसमान मानली
रयतेचा राजा 'लेकुरवाळा'
प्रजा सारी बापासम सांभाळली।। ३।।
झुकला शिवबाच्या तलवारी पुढे
दिल्लीचाही सारा तख्त
मंदिर नाही माझ्या राजांचे एकही
तरीही जगात करोडो भक्त।। ४।।
आले किती, गेले किती
राजे या अवनीवरती
शब्द ऐकता 'राजे' हा
आठवे फक्त नि फक्त 'शिवछत्रपती' ।। ५।।
