दादा आयुष्यभर साथ दे या बहिणीला
दादा आयुष्यभर साथ दे या बहिणीला
सखा भाऊराया माझा
उभा असे सदा पाठीशी
सुख दुःखात सहभागी
बंध रेशमाच्या गाठीशी
आपुलकी जिवाभावाची
ऋणानुबंध नातं आमुचं
रक्षणार्थ सदैव तत्पर
असच नातं बहिण भावाचं
अंतर्मन तुझे किती मोठे
पाझर फुटतो ह्या हृदयाला
एकुनी गाथा तुझ्या किमयेची
हर्ष होतो माझ्या मनाला
बापापरी धाक , दरारा
तुझा असला जरी मजवरी
त्यात दडलंय अथांग प्रेम
अशी तुझी किमयाच न्यारी
कधी रुसवा,फुगवा होताच
बाजू कधी माझी घेणारा
पुरवितो माझे सर्व लाड
युगायुगाने साथ देणारा
तुझ्या चरणी होऊनी
आज बहिण नतमस्तक
ओवाळणीला नको साडी
हवे तुझ्या सुखाचे पुस्तक
वाईट दृष्ट नको कुणाची
आपल्या पवित्र नात्याला
दादा आयुष्यभर साथ दे
तुझ्या ह्या लाडक्या बहिणीला
