चुकलेली वाट
चुकलेली वाट
जेव्हा कधी तरी , मी माघारी वळून बघते
खूप काही हातचे , सुटल्यागत वाटते
एकदा चुकलेली वाट , प्रयत्न करूनही न मिळते
पण हे सत्य मात्र , चुकल्या वरच कळते
मागे फिरण्याची , संधी शोधत राहते
संधी मिळत नाही आणि जीवन चालतच जाते
चालता - चालता , आयुष्य शेवट गाठते
अन् एका सांजवेळी , फिरून भूतकाळ आठवते
भूतकाळात केलेल्या , चुकांना माफी शोधते
मन हे विचारांच्या वादळात , अजूनच गुरफटते
गुरफटलेल्या मनाला , शांततेची आस जागते
मिळवण्यास ही शांतता , परत प्रवास मी सुरू करते
निरंतर प्रवासाने , व्यक्ति प्रगती साधते
जे सुटले मागे , पुन्हा तेही परत मिळवते
