चटके बालपणीचे
चटके बालपणीचे
असं पण असतं का बालपण
गेलं त्या निखाऱ्या उन्हानं करपून
होतं ते वय राहावं खेळून बागडून
पण कुणा ठाव कुठं गेलं ते हरवून
नसता माय बाप मिळेल कुणाचे रक्षण
असं पण असतं का बालपण...!!
किडी इवल्याश्या त्या पोटाशी
झोपावे लागे कधी कधी उपाशी
कशी निद्रा येईल त्या जीवास
एक रात्रीसाठी तुटले जे नाते शिताशी
कोण भरविल घास दाखवून आपलेपण
असं पण असतं का बालपण...!!
बसती चटके पोळून काडी
कोमल पायात नसता जोड
शिकण्याची जिद्द ठेऊन मनी
ऊन्हात चालली इवलीशी ती पोर गोड
मायेनं कधी तिचे होईल का पालन
असं पण असतं का बालपण...!!
जिद्द लागली ती एक त्या मनाला
विद्या घेईल मज आपल्या उराशी
मोठं होता ना होऊ कोणाची दासी
सारं काही असावं स्व हाताशी
जगण्याच्या
ही मिळाली शिकवणं
पण कुठेतरी हरवले ते बालपण...!!
नको रे देवा देऊ दुःखाची आठवण
मौज मजा सुख दे तु भरभरून
झऱ्याचे गोड पाणी नको टाकू आटवून
नको रे देऊ देवा असं एकटेपण
कुणा वाट्यास असं नको बालपण...!!
