चोवीस(24)
चोवीस(24)
दहाव्या दिवसाची सुप्रभात...कबुतरमय...!
द हा वाजले हा हा म्हणता
हा सूर्यही तापू लागला
व्या धी ग्रस्त जीव माझा
दि वसाच उसासे टाकू लागला...
दि नरात एक करून
व जन ठेवले काबूत
सा मंजस पणाची कसोटी पार पाडली
चि काटीने बुद्धी ठेऊन शाबूत...
सु जाणते पणाने सारे नियम
प्र सन्नतेने पाळले
भा ग्य तेंव्हा कोठे थोडे
त नाचे आरोग्य सांभाळण्यास आले...
क रमणूक म्हणून गच्चीत
बु जगावणे होऊन स्तब्ध बसता
त टस्थ होऊन स्थिर रहावे लागले
र मत गमत तेंव्हा कोठे कबुतरांचे येणे झाले...
म ला पाहून कबुतरांना
य दाकदाचित भय थोडे वाटले असावे
म्हणून कबुतरांनी मान उंचावून
थोडे अवलोकन केले असावे....
भयाची चाड बाजूस ठेवून
दाणे टिपले पटापटा
म्हंटले किती लवकर
काम करतात ही कबुतरे झटझटा....
अस्थिर नजर अस्थिर चाल
वेधक कार्यतत्परता भेदक लक्ष साधकता
सारे टिपता माझ्या नजरेने
म्हंटले काही तरी शिकावे नम्रतेने......
कार्यभाग आटोपून
ती भुर्रकन उडून गेली
जाता जाता मला कबुतरे
बरेच काही शिकवून गेली.....!
