चंद्र म्हणाला......
चंद्र म्हणाला......
1 min
170
चंद्र म्हणाला हरकत नाही
थोडक्यात ही हुकली भेट
मनापासुनी दादही देतो
प्रयत्न केला खूपच ग्रेट
उंबरठ्यावर येऊन सुद्धा
अलिंगनाची अपूर्ण ओढ
पुढच्या वेळी कराच ‘विक्रम’
तोंडही तुमचे करीन गोड
अंतराळही आसुसलेले
इथे तिरंगा बघण्यासाठी
आकाशगंगा हेच म्हणाली
हवाच तो क्षण जगण्यासाठी
