चंद्र माझ्याशी बोले..!
चंद्र माझ्याशी बोले..!

1 min

170
देईन सख्या तुला,
सुखाची सारी निदाने..
एरवी खोटीच वाटती,
आयुष्याची सारी प्रदाने...! १.
सावरेन सख्या तुला,
आयुष्य नव्हे खरे..
तोल जाईल तेव्हा,
हात-हाती नव्हे बरे..! २.
हार करांचे कोवळे,
का..विणती नक्षी गळ्यात..
पुसेन आसवे तुझी,
भाल-कपोल चुंबित...! ३.
डोळ्यात चंद्र जेव्हा,
उतरूनी रात्री येई..
माझ्याशी बोलताना,
तो पाशात बध्द होई..! ४.
किती गुज सांगू तुला?,
सारे माझ्या हळवातले..
स्तिमित..मग्न मी विस्मित,
जेव्हा चंद्र माझ्याशी बोले...! ५.