चंद्र आकाशीचा
चंद्र आकाशीचा
1 min
711
एकतीस डिसेंबरला कुट्ट नभांगणी
आतुरतेने वाट पहात होतीच त्याची
कधी येईल नि बदलून टाकेल जीवन
पहात होती नभात शोभा चांदण्यांची
आगमन व्हायला उलटतील तास बारा
सुटला होता धुंद करणारा हा मंद वारा
थंडीने अंगावर उठला होताच शहारा
रोमांचित कानी शीळ घाली रानवारा
कोण म्हणूनी तुम्ही काय मजला पुसता
अहो शांत अशी प्रेयसी निशा तिचे नाव
काळोखातच चाचपडते ठेचकाळतेय
वाट पाहतेय दिवसाची कळले का राव
