चमचमीत जेवण जेवू नकोस
चमचमीत जेवण जेवू नकोस
जीवन असंच असतं मित्रा
जास्त रिस्क घेऊ नकोस
कंट्रोल कर जिभेवर जरा
चमचमीत जेवण जेवू नकोस
कॅलरी चं प्रमाण वाढलं तर
शरीरात चरबी साठेल
मेटाबॉलिझम बिघडेल आणि
अशक्तपणा वाढेल
नशापाणी करून जीवन
नरकाच्या दारात नेऊ नकोस
कंट्रोल कर जिभेवर जरा
चमचमीत जेवण जेवू नकोस
व्यायाम नाही केलास तर
नक्कीच बर्बाद होशील
एक्स्ट्रा फॅट्स जळणार नाहीत
स्थूल अमर्याद होशील
आळसाला थारा कधीही
आयुष्यात तू देऊ नकोस
कंट्रोल कर जिभेवर जरा
चमचमीत जेवण जेवू नकोस
सर्व रोगांचं मुळ मित्रा
तूझ्या पोटातच दडलंय
आरामदायी जीवन हवंय
इथेच सारं नडलंय
आत्ताच सावध हो जरा
मरणाचा दिवा तेऊ नकोस
कंट्रोल कर जिभेवर जरा
चमचमीत जेवण जेवू नकोस
