चला पंढरीसी
चला पंढरीसी
प्रत्येक भक्ताचे / प्रेमाचे माहेर
हक्काचे माहेर / पंढरीसी (१)
जमे आषाढीला / भक्तांचा मेळावा
देव भक्तिभावा / भुकेलेला (२)
भरे वाळवंट / वारकरी दाटी
विठ्ठलाची भेटी / माहेरासी (३)
साजिरे गोजिरे / रुप मनोहर
हात कटीवर / विठ्ठलाचे (४)
प्रापंचिक भाव / इथे मिटताती
विठ्ठलाची प्रीती / पंढरीसी (५)
माहेर मायेचे / वारकरी येती
माया प्रेम देई / माऊलीच (६)
विठ्ठल नामाचा / मुखाने उच्चार
टाळांचा गजर / मोदभरे (७)
चंद्रभागा स्नाने / होई पापमुक्ती
विठ्ठलाची मूर्ती / ओढ जीवा (८)
एकादशी दिनी / सुख दर्शनाचे
सार्थक वारीचे / मनोमनी (९)
