चला माणूस बांधूया.....
चला माणूस बांधूया.....
1 min
493
माणसातील माणूसकीसाठी
माणूसकी जपण्यासाठी
चला माणूस बांधूया,
अंतरीच्या उमाळ्याने
संवादातील जिव्हाळ्याने
चला माणूस बांधूया.
माणसाच्या भविष्यासाठी
माणसाच्या विकासासाठी
चला माणूस बांधूया,
माणसातील माणूसकीने
माणूसकीच्या नात्याने
चला माणूस बांधूया.
भरपूर झाली बांधून
घरे व इमारती
चला आता माणूस बांधूया,
माणसाने माणसासाठी जगावे
यासाठी तरी आपण
चला माणूस बांधूया.
