चल ना रे
चल ना रे
1 min
377
चल ना रे कुठेतरी
ट्रॕकिंगला आपण जाऊ
उंच उंच धबधब्या खाली
नाचु आणि गाऊ......
हिरव्या हिरव्या डोंगर रांगा
तल्लीन होऊन पाहु
हातात तुझ्या हात घेऊन
स्वप्नामध्ये रमु......
सारे कटकट सारे मरगळ
तिथेच सोडून देवू
निसर्गातुन चैतन्य नवे
नवे आशा घेऊन येऊ......
धुरक्याने झाकलेले
वाट आपण पाहु
दवबिंदुच्या स्पर्शाने
प्रफुल्लीत दोघे होऊ......
चिंब चिंब होऊन
तु आणि मी पावसात भिजू
मंद प्रकारचे आस्वाद घेत
मन आपले रुजवु......
