चल ना रे
चल ना रे
1 min
130
चल ना रे कुठेतरी
ट्रेकिंगला आपण जाऊ
उंच उंच धबधब्याखाली
नाचू आणि गाऊ...
हिरव्या हिरव्या डोंगररांगा
तल्लीन होऊन पाहू
हातात तुझ्या हात घेऊन
स्वप्नामध्ये रमू...
सारी कटकट सारी मरगळ
तिथेच सोडून देवू
निसर्गातून चैतन्य नवे
नवी आशा घेऊन येऊ...
धुरक्याने झाकलेले
वाट आपण पाहू
दवबिंदूच्या स्पर्शाने
प्रफुल्लीत दोघे होऊ...
चिंब चिंब होऊन
तू आणि मी पावसात भिजू
मंद प्रकारचे आस्वाद घेत
मन आपले रुजवू..
