STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

चल ना गं आई

चल ना गं आई

1 min
377

चलं ना गं आई

कुठेतरी जाऊ

कंटाळा आलाय

भटकून येऊ


कोरोनाने सर्व

वैतागून गेले

मरगळ सारी

विसरुया गडे


सप्तरंगी धनू

हिरवाई साज

धबधबे शुभ्र

बघूया ना आज


थंडगार हवा

वाटे खूप छान

फिरुन येऊ गं

मनी समाधान


काढी बाबा गाडी

वेग लई भारी

मन माझं कसं

घेतंय भरारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन