STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

चिवचिवाट चिमण्यांचा

चिवचिवाट चिमण्यांचा

1 min
364

चिवचिवाट चिमण्यांचा होता 

मज झाड अंगणातले आठवते

किलबिल असे रोज सकाळी 

आजही ती कानी साठवते!


झाड भरून चिमण्या असत 

दिवसभर त्यांची पळापळ 

आईची आठवण करून देत 

तिचीही अशीच धावपळ!


ना रंग-रूप दिमाखदार,

ना मोरासम कसला तोरा 

गोजिरवाण्या परी कशा

आगळाच त्यांचा नखरा!


शहरातल्या या खिडकीतून 

दिसत नाही सारा आसमंत

कल्पनेत असतात भराऱ्या 

कमी दिसतात यांची खंत!


Rate this content
Log in