चिऊताई.
चिऊताई.
काड्यामुड्याचं घर केलं,
गवताचं मऊ अंथरुण,
सोबत बाळं लहान, लहान,
चिऊताई तुझं सदन छान.
धान्यांच,पेव नाही,
पैशाची तिजोरी नाही,
सांभाळण्याची काळजी नाही,
गगण तूझं उंच उंच,
घे भरारी आनंदाची लूट.
चिऊताई तुझं निवास छान.
पावसापाण्याची भिती नाही,
झाडावर बसुन पूर पहा,
भूक लागली उडून जा.
चिऊताई तुझ आलंय छान.
निसर्गातली काडी,
निसर्गातला तरु,
फांदीला ओझ नाही,
झाडाला अडचन नाही,
घराला बेडरुम नाही,
किचन करण्याचा प्रश्नच नाही.
चिऊताई तुझं होम छान.
एक बंगला दुसरी गाडी,
असलं तुमचं काहीच नाही,
पार्किंगची भानगड नाही.
मुक्त आकाश मुक्त जीवन,
पंख तुझे छान छान,
चिऊताई तुझं घर छान.
चिऊताई तुमच्यात,
निवडणूक नाही,
मतदानाचा प्रश्नच नाही,
कोणत्या पक्षाचे असं,
काहीच नाही.
चिऊताई तुमची,
लोकशाही छान.
रंगरंगाचे फुले,सारी,
कधीच नाही करत हार,
तुझ्यात नाही मानपान,
निसर्गातला तू पक्षी महान,
चिऊताई तुझं जीवन छान.
