STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

चित्र नगरी...!

चित्र नगरी...!

1 min
11.2K

आपल्याला बाबा

जन्मा पूर्वीच काही माहित नाही

शहरात येई पर्यंत काही

चित्रनगरीच गौडबंगाल कळलं नाही...

खोक्यातल टॉकीज पाहिलं

चोरून शाळेच्या मागच्या गल्लीत

आनंद मिळाला तेंव्हा जणू

आम्हीच होतो त्याक्षणी दिल्लीत...

हांवर मज्जा देखो, राणी का बाग देखो

दिल्ली का कुतुब मिनार देखो

आग्रे का ताज महाल देखो ते

कलकत्ता का हावडा ब्रिज देखो म्हणताच

मुंडक बाजूला व्हायचं...

त्या एक दोन पैशाच्या चित्रांनी

आमची दुनिया रंगीन व्हायची

चोरी सापडली की रंगीत तालीम

घरी रंगून पाठही रंगून जायची .....

दिवस बदलले काळ बदलला

सिनेमागृहात संगतीने पाय पडला

वाटले चमत्कार घडला

जुन्या नव्याचा एकदा संगम झाला...

नाटक तमाशा दूर राहिले

सिनेमाने जुन्या नव्याचे द्वार उघडले

दादासाहेब फाळके, दामूअण्णा मालवणकर 

पृथ्वीराज कपूर ,बलराज सहानी, गुरुदत्त

राजागोसावी ,गदिमा, अरुण सरनाईक

बालगंधर्व,सैगल, ओपी नय्यर,रफी ,किशोर

लता आशा उषा सुलक्षणा,जयश्री गडकर

ते सर्व सर्व चित्र नगरीचे शिलेदार 

नकळत डोक्यात शिरले

आणि मौज मजेचे क्षण वेचता आले...

आज मागे वळून पाहताना

प्रगती डोळ्यात मावत नाही

पण जुन्याची गोडी मात्र

अजूनही नव्यात काही सापडत नाही....!


Rate this content
Log in