STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

चित्र लावणी

चित्र लावणी

1 min
446

वयात येता हिरवागार ह्यो, आंबा अंगानं भरला नजर नका लावू त्याला, आत्ताच बाठ धरला ||धृ||

 

कवळी हिरवी कैरी लटकलीय फांदीला भल्याभल्यांची नजर तिच्यावर येण्या पाडाला

पोपट जमले झाडावरती टोच त्यांनी मारला

नजर नका लावू त्याला, आत्ताच बाठ धरला ||१||


रसाळ आंबा पिवळाजर्द चव त्याची मधुर

अढीत ठेवा पिकायाला लागे तो चवदार

लपवून ठेवू पाड लागता हातच का धरला

नजर नका लावू त्याला, आत्ताच बाठ धरला ||२||


पाहता टपोरी हिरवी कैरी लाळ लागे गळायला

थांबा जरा दम धरा ठेवलीय तिला पिकायला

रस आंब्याचा खाया पाव्हणं याच तुम्ही घरला 

नजर नका लावू त्याला, आत्ताच बाठ धरला ||३||


Rate this content
Log in