चित्र देखणे
चित्र देखणे
1 min
413
रंग माझ्या आकांक्षाचे
लावीन साऱ्या नभांगणाला
उत्कर्षाची करुनी शिडी
गवसणी घालीन गगनाला
आकांक्षाच्या पुढती भासे
गगनही आता मजसी ठेंगणे
मेहनत माझी फळास येईल
होईल एक चित्र देखणे
रंग भरून त्या चित्राला
स्वप्न येईल आकाराला
करुनी नभाच्या पायघड्या
हात लाविन मग स्वर्गाला
