चिमुटभर...
चिमुटभर...
चिमुटभर ज्ञान माझं
चिमुटभर व्यासंग
तरी पाजळू मी पाहतो
लाभता आपला संग....
मराठी भाषा आपली
समृद्ध आहे मुळात
भाग्यवन्त आम्ही
जन्मलो मराठी कुळात...
चुका असतील अनेक
चुका होतील अनेक
पण भाषेत भाषा मराठी
आपलीच सुंदर एक....
इथे नसेल व्याकरण
इथे नसेल कधी कारण
तरी भाव व्यक्त करण्यास
मिळते मुबलक सारण....!
खाल्ला जरी भात वरण
नाहीतर पोळीतले पुरण
नळी सुक्के तांबडा पांढरा
होते आपोआप विचारांचे दळणवळण....
अडत नाही काही
आडत नाही कधी
कशीही वळते बदलून कुस
अर्थ घेऊन दावण्या अमूल्य मुस...
गुण्यागोविंदाचे जीणे
असो गाव अथवा माहेरघर पुणे
भाषेस नाही वाणवा कशाची
काहीच नाही उणे....
चिमटी चिमुटभर
भर घालावी सर्वांनी नितदिन
थेंबे थेंबे साचते मग
पाहण्या समृद्धतेचा खरा सुदिन....
मराठी मी, माझी मराठी
भाव तिथे खरा देव
वाटते कवी लेखक शिलेदार एक
फुटू देत भाषेचे पुन्हा सुंदर पेव....!
