STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

चिमणीला आठवून

चिमणीला आठवून

1 min
136

मनाला भावले ते लिहिले

काव्यभाव जागृत ठेवून

प्रेमाचे चार शब्द टिपले

इवल्याशा चिमणीला आठवून//१//


     मी कवी शब्दवेडा जरूर

     शब्दांचा डोंगर ठेवतो एकवटून

     सुचले थोडे जरी काही मनाला

     लगेच शब्द घेतो पहा टिपून//२//


येतील पिढ्या जातील पिढ्या

कविता मिटणार नाही जगातून

शब्द सागराच्या लाटा उसळत

ठेवतील निरंतर एक आठवण //३//


   चंचल मन, रहात नाही स्थिर

  चाळून शब्द येते कविता जुळून

  शब्दाला शब्द नेक ,आठवून निट

  जी देते नवलाई जी येते कळून

 इवल्याशा चिमणीला आठवून //४//


Rate this content
Log in