चिमणी
चिमणी
चिवचिवाट तो थांबला तुझा
घरटेही तुझे कुठे दिसेनासे झाले
ओसाड झाली अंगणे सारी
झाडही तिथे एकटेच उभे ठाकले...
येशील तू म्हणून आजही मी
घेऊन हातात दाणे थांबलो दाराशी
झाड अंगणातले पाहते आहे वाट तुझीच
देते आहे एकटेच ते झुंज त्या वार्याशी...
काडीही थकली वाट तुझी पाहून
घेतले तिनेही स्वतःला मातीत सामावून
झाले शांत इथले वातावरण सारे
चिवचिवाट तुझा आज इथून गेला हरवून...
आहेस कुठे तू नि कशी आहेस..?
हे सांगायला तू किमान एकदा तरी ये
वाटतो ऐकावा चिवचिवाट तुझा सारखा
आवाज तुझा तो एकदा कानी पडू दे...
