चिमणी
चिमणी
1 min
297
चिऊताई चिऊताई
ये ग माझ्या अंगणी
देईन मी तुला अग
दाणा अन् पाणी.....
तू अशी रुसू नको
लावली झाडे पसरदारी
खोपा पिलांसाठी बांध
चिऊताई माझ्याच दारी.....
उडत जा, चिऊ चिऊ कर
अंगणात चकरा मार
पिलांसोबत छान चिऊताई
गोल गोल फेर अंगणी धर.....
दाणापाणी देईन तुला
तुझी हक्काची जागा देईन
तुला हाकलणार नाही कोणी
तुला हवे ते सारे सर्व करेन....
