चिमणी
चिमणी
झाडावर चिमणी
दोन मिनिटं येते
चिव चिव करते
परत जाते।
बघते ती आपल्या पिल्लाना।
घरट्यात ती सुरक्षित आहे ना।
पिले पण तिची खूप हुशार
आई घरट्यात नसताना शांतता
त्यांची बेमीसाल।
आई घरात आल्यावर चिवचिवाट
इतका असतो।
पोटात चार दाणे गेल्यावर कळते।
पोट भरल्याचा आनंद काय असतो।
ती जाते दाणे आणायला तेंव्हा
तिला काळजी किती असते पिलांची।
काळजावर दगड ठेऊन करते
तरीपण ती सोय पिलांच्या पोटा पाण्याची।
मुक्या प्राण्यांनाही जीव असतो
जगतात त्यांच्या परीने।
खोपा पडतो कधी त्यांचा वादळ वाऱ्याने।
पडते कधी छोटे पिलू घसरून त्याच्या चुकीने।
नाही सांगत दुःख कुणाला लढतात हिमतीने।
येता घरट्यात बघता आपलं कुटुंब
सुरक्षित आहेना।
होतो आनंद एवढा त्यांना की
त्यांना ,मला शब्दात मांडावा कसा मला सुचेना
शब्दात मांडावा कसा मला सुचेना
