चिमणी उडाली भुर्रकन
चिमणी उडाली भुर्रकन
1 min
767
छोट्याशा चिमणीचा,
चिवचिवाट किती,
धिटुकली घरी येते,
वाटत नाही भीती?
माडीवरच्या खाचेत,
घरटे तिचे चिमुकले,
काडी काडी जमवून,
कसे नेटाने बांधले!
वाडग्यात तिच्यासाठी,
पाणी होते मी ठेवले,
पटपट टिपायला तिला,
दाणे ही होते टाकले!
धावपळ, घाई गडबड,
दिसे मजेशीर मोठी,
कष्ट करी बाई जशी,
काम करी पिलांसाठी,
भिंतीवरची पाल पाहा,
तिकडे पळाली सर्रकन,
अंदाज येता लगेचच,
चिमणी उडाली भुर्रकन!
