छत्रपती
छत्रपती
1 min
360
कित्येक होते शत्रू तरी, कधी मागे नाही हटले.
कधीच हरणार नव्हते, त्या सत्यालाही पटले.
आई बहीणी सुखी होत्या, सुखी होती रयत.
आताच आमची नियत बिघडली, बुद्धीला आणली सवत.
शिकवण दिली आम्हा, परस्त्री आई प्रमाण.
प्रसंगी चौरंगा केला, सर्वास कायदा समान.
आठरा जाती बारा पगड, आणले सगळ्या एकत्र.
अधिकार दिला सगळ्यांना, स्वराज्याचे नक्षत्र.
झाले जुलम्यांचे अती, रयत जात होती सती.
पेटून उठली मराठी माती, तारणहार आमचे छत्रपती.
