छत्रपती शिवराय
छत्रपती शिवराय
छत्रपती शिवराय
मराठ्यांचे सरदार
धुरंधर शूरवीरं
घेई हाती तलवारं......
नाही घाबरला कधी
रणी उभा तो ठाकलां
नाही झुकविली मान
पराक्रम गाजविलां.........
पाणी पाजले वैऱ्यास
धूळ चारली मैदानी
मिटविली मातीमंदी
हुकूमत सुलतानी...........
खान फौलादी पुरुष
आला चालून रणातं
खान करताचं वार
लोळविले मैदानातं .........
आला धावून तो बंडा
शिवबाच्या अंगावर
जीवा महालाने केले
एका पट्ट्यातच ठारं ............
सुड घेतला रणात
मोठ्या भावाच्या खुनाचा
कट्यारीने केला वार
मुर्दा पाडला खानाचा ............
धीर द्याया रयतेला
शिवबाचा जन्मं झाला
जिजावूच्या पोटी बाळ
शिवराय जन्मां आला ............
नाही केला जातीभेद
नाही धर्म भेद केला
सर्व जातीचे शिपाई
होते सैन्यात सेवेला .............
