छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
1 min
318
लक्ष लक्ष दिव्यांनी सजला शिवनेरी किल्ला
शिवबाचा जन्म जाहला, वीर अवतरला
निष्णात पराक्रमी, शूरवीर असा असे क्षत्रिय
सर्व जनांसी सामावून घेई तोच एक मैत्रेय
तळपती तलवार, अलवार ढाल हाती
रुबाब तयाचा कसा, सांगावी काय मी महती
दिधला लढा स्वराज्यासाठी हिंदवी असा
शत्रूंचा खात्मा केला, गुणी स्वभावी कसा
जिवलग त्याचे मित्र मावळे सर्व धर्म जातीचे
शिकविती रयतेस धडे तो एकात्मकतेचे
हुशार, गनिमी, श्रीमंत योगी हा जाणता राजा असे
उदारातुनी शिवराय घडावा स्वप्न मातेचे असे
युगानुयुगे होणे नाही शिवराय सारखे दुजे
त्रिवार प्रणाम माझा घ्यावा शिवछत्रपती राजे
