छत्री
छत्री
1 min
486
शुभ्र पांढऱ्या नभात
गडगडतात काळे घन
डोळे नभात शिरताना
पळते आठवणींकडे मन।।
सूर्य हळूच लपून बसतो
गडगडणाऱ्या आवाजाला
अंगावर हळूच शहारा देतो
वाऱ्याची मैत्री जोडताना।।
विजेच्या लख्ख प्रकाशाने
उजळते ती अवनी
पावसाच्या सरींनी सर्वत्र
हिरवळ दिसे या नयनी।।
चिंब चिंब भिजताना
पावसाशी जुळते मैत्री
अलवारपणे सर झेलताना
डोईवर उभी राहते छत्री।।
