STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

छोटी विनंती...!

छोटी विनंती...!

1 min
221

म्हटलं छोटी

कविता लिहुया

छोटीच आज

विंनंती करूया...


ग्रुप आपला

सुज्ञ सुजाण

इथे नाही

विचारांची वाण...


जो तो

आपल्या पुरता महान

भागवितो आपलीच

लिखाणाची तहान...


कोणी वंदो

अथवा कोणी निंदो

आपण आपल्या मस्तीत

राहतो लिखाण चुस्तीत...


म्हटले नसेनात का

लाईक्स आणि कॉमेंट्स

आहेत सारे

आपलेच ग्रुपमेट्स...


संख्या बळ

असले थोडे जरी

उचलून धरतील

मतदानाचे धनुष्य करी...


मतदान करतील

मनापासून

आठवण ठेवतील मैत्रीची

नक्की मतदान करून...


म्हणून तर मित्रांनो

कवितेचा आज घाट घातला

काव्यातूनच पहा कसा

सुरेख आविष्कार नटला...


Rate this content
Log in