STORYMIRROR

Prachi Kulkarni

Others

3  

Prachi Kulkarni

Others

छंदमयी मी

छंदमयी मी

1 min
329

जेव्हा घड्याळाचा काटा संथ चालतो

हुरहूरल्या मनात गोंधळ माजतो,

तेंव्हा, कोणीतरी हात धरून दूर घेऊन जाते 

त्याच्यासंगतीने जगण्याचे गाणे होते,

अशा कित्येक वाटा गवसल्या

आणि छंदानी ओंजळी भरल्या

वाचताना पुस्तकात गेले हरवून

लिहिताना कवितेत गेले रमून

पानफुलांसवे प्रच्छन्न बहरले

सूरांमध्ये मीपण विसरले

या छंदासोबत रोज फुलते आहे

जुनाच दिवस पण नव्याने जगत आहे


Rate this content
Log in