छंद
छंद
1 min
367
छंद
जडला आहे असा छंद
झालोय मी त्यातच धुंद
लिहिताना मिळतो मज
नित्य नवा नवा आनंद
लेखानिशी ह्या माझा
आहे खूप जुनासा बंध
ती असता सोबत माझ्या
नको दुसरा कोणता छंद
मी नेहमीच असा राहतो
माझ्या माझ्या विचारात धुंद
आणि हे लोक इथले समजता
मी झालोय आता मतिमंद
आता त्यांना कसे सांगावे
ज्याचा नाही त्यांना गंध
असा माझ्या मनी नाचतो
एक वेगळाच लेखणीचा नंद
