छंद माझा वेगळा
छंद माझा वेगळा
1 min
495
वाचणे , खेळणे , चित्रकला
देतात विरंगुळा मनाला
म्हणून या सर्व गोष्टी
छंद म्हणवून घेतात ना ?
पण मला मात्र ,
विरंगुळा देणाऱ्या या गोष्टी
कधीच छंद वाटत नाहीत
छंदाची व्याख्या माझी
थोडी वेगळी, थोडीशी खुळी
छंद म्हणजे, जावे स्वतःमध्ये हरवून
काही क्षण भान हरपून
स्वतःच्या विश्वात जावे रमून
वेळ द्यावा स्वतःला थोडा
बोलाव स्वतःशी , हसावं स्वतःशी
आणि क्वचित गरज पडली
तर , रडावही स्वतःशीच
असा हा वेगळा छंद माझा
थेट मनाशी संवाद साधणारा
