छंद जोपासण्यासाठी..!
छंद जोपासण्यासाठी..!
किती दिवस झाले के करावं हे कळतंच नव्हतं
जिकडे तिकडे फक्त अभ्यासचंच ओझं वाटत होतं
किती दिवसांचं विसरलोय मी खेळणं, कुदण, जोरात हसणं, अन जगाकडे मन मोकळं करून बघणं
मन विसरूनच गेलंय जगात अभ्यासाव्यतिरिक्तही काही असणं
इतका अभ्यास करणाऱ्यांच्या जिद्दीला पाहून करावा वाटतो सलाम
पण कुठेतरी वाटतं आपण झालो तर नाही ना त्याचे गुलाम?
इतका अभ्यास करून होईलही मी मोठा
पण मन आणि हृदयाच्या आरश्यासमोर पडणार तर नाही ना मी खोटा
मोठेपणी माझ्याकडे असेलही मोठी कार
पण माझ्याच मनाचा नसेल ना मी गुन्हेगार?
मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत मी विसरलोच स्वतःकडे पाहून जगणं
स्वतःच्या अंतरंगात मन मोकळं करून बघणं
कळत नाही मला कसा काढावा वेळ
कधी कधी वाटते सोडून द्यावे
जीवनाचे सर्व खेळ
कधी वाटते सोडून द्यावी सारी धुंद
बेधुंद होऊन फक्त जोपासावे छंद
फेकून द्यावे वाटते अभ्यासाचे ओझे लांब कोठेतरी
अन पुन्हा लहान होऊन करावी मजा
माहितीये मला हे आता नाही शक्य..
पण तरीही न हार मानता करावा तो फक्त प्रामाणिक प्रयत्न..
छंद जोपासण्यासाठी.....!
