छंद जोपासण्यासाठी..!
छंद जोपासण्यासाठी..!
1 min
443
आता घेऊ का अभ्यासाचा थोडा आनंद
पण ह्याने बसणार नाही ना माझ्या छंदांवर प्रतिबंध?
वाटलं होतं उडेन मी आकाशी झेप घेताना
पण बदलून गेलं जग वय वाढत जाताना
वाटते की स्पर्श करावा या काळ्या नभांना
पण इजा तर होणार नाही न माझ्या नाजूक पंखांना?
फुलवून टाकावे आजच त्या गुलाबी कळ्यांना
राग तर येणार नाही ना इतर सुंदर फुलांना?
वाटते असे की खेचून घ्यावे इंद्रधनुष्याच्या रंगांना
पण तडा जाणार नाही ना माझ्या रंगीत स्वप्नांना?
