STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

छकुलीचे स्वप्न

छकुलीचे स्वप्न

1 min
178

छोटी छकुली दमली

पटकन झोपी गेली

बनातली फुलराणी

हलकेच स्वप्नी आली   (1)


गोड तिची हास्यमुद्रा

हात घेतला हातात

छकुलीला हर्ष मनी

कळी खुलली मनात   (2)


फुलराणी नेई तिला

गोड फुलांच्या बनात

रंग गंधाने भरला

दरवळ मानसात      (3)


लाल गुलाबी पिवळी

फुले गुलाबाची बनी

चाफा मोगरा चमेली

रातराणी जाई जुई    (4)


फुलराणी फूल देई

घेई छकुली हातात

ओठांवर हसू येई

रमे स्वप्न जगतात     (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन