छेडीता तरंग
छेडीता तरंग

1 min

11.7K
शांत डोहात पहुडलो मी
नव्हती कशाची चिंता कधी
स्वतःतच मी गुंतलो होतो
माझ्याच निर्मीत जगरहाटीत!
छेडीता कोणी तरंग उठती
वरवर दिसती थोडीच लहरी
हळुहळू ती शांत होती
मशगुल मी माझ्यात परती!
कसा हा छेडता आम्ही
शांतच असतो सदा कदी
छेडू त्याला त्याच्याच कमजोरीने
शत्रुपक्ष ठरवत गेले वारकरण्या!
शांत धीर गंभीर नेहमी
राहुन परवत गेलो वार
कमजोरी स्वतःत दिसताच आत्मचिंतन
करता बनलो आत्मनिर्भर डोहातच!