छावा शिवछत्रपतींचा
छावा शिवछत्रपतींचा
असा होता आमचा राजा छावा शिवछत्रपतींचा
होता शूर बलशाली शिपाई भगव्याचा
वाघाच्या जबड्यात हाथ घालूनि दात मोजणारा छावा शिवछत्रपतींचा...
सोसले भोगले अनन्वित अत्याचार यवनांचे पण झुकला नाही त्याचा अभिमान असा छावा शिवछत्रपतींचा
स्वराज्यासाठी झुंजला आमचा छावा शिवछत्रपतींचा...
फितुरांनी केला घात त्यात अडकला बाळ सह्याद्रीचा
झुंजत राहिला ४० दिवस स्वराज्यासाठी छावा शिवछत्रपतींचा
असा धुरंदर, किर्तीवंत शौर्यवंत, विचारवंत सोळा भाषा पारंगत छावा शिवछत्रपतींचा...
संगमेश्वरी काळ होता बैसुनी झुंज तरी दिली छाव्याने
परी अंती जेरबंदी करुनि नेला छाव्याला बहादुर गडी...
सुटले बादशहाचे फर्मान काढा याचे नेत्र सळ्या घालून
छावा तरीही नाही झुकला...
शिवबा-जिजाऊ दिसे त्याला असा निडर छावा शिवछत्रपतींचा...
सुटला दुसरा फर्मान छाटा याची जीभ
भाल्यानं प्रहार करुनि डोक्यावर दाबून नाक
माझ्या राजाची छाटली जीभ छाव्याची
परी मागितली नाही भीक सुटकेची...
सुटला तिसरा फर्मान सोला कातडं याचं तलवारीनं
हबशी आले चारी बाजूनं चरा चरा चालली तलवार
कातडं काढलं आमच्या राजाचं
छावा झाला रक्तबंबाळ तरी सोडला नाही स्वाभिमान असा छावा शिवछत्रपतींचा...
आता सुटला अंतिम फर्मान आता सुटला अंतिम फर्मान
राजाचे मस्तक करा कलम
तरी छावा आपला धीट असा शूर मर्द छावा शिवछत्रपतींचा...
बलिदान असे पाहुनी थरथरली इंद्रायणी कापला तख्त सह्याद्रीचा
असा होता शूर स्वाभिमानी छावा शिवछत्रपतींचा...
