चहा दिन...!
चहा दिन...!
आज जागतिक
चहा दिवस...!
चहाच कौतुक
कधीतरी मिळण्यात असतं
रोजच्या मड्याला
कोण रडतं
जागतिक दिन बीन
सार सब झूट आहे
तरी ही सूटा बुटाची
वाटते ही लूट आहे
त्या साहेबाची ही
आमच्या देशातली राड आहे
अजूनही लागली सवय
वाटते खरीच द्वाड आहे
सारा जन्म गेला
चहाला नको म्हणता म्हणता
तरीही जाईल तेथे
होते चहा घ्या घ्या नको असता
आज मात्र खरीच हद्द झाली
जागतिक चहा दिन
साजरा करण्याची
आमच्यावर वेळ आली
तोंडाला पाणी सुटते
जेंव्हा चहाचे नाव निघते
एक घोट तरी घेण्याची
मग तलफ उठते
गरम गरम चहाचा घोट
विचार साधा सरळसोट
काढातो मग दहाची नोट
तेंव्हा कोठे खुश होते माझे पोट...!