चहा आणि काॅफी
चहा आणि काॅफी
1 min
134
चहा म्हणजे उत्साह,
काॅफी म्हणजे स्टाईल,
चहा म्हणजे मैत्री,
काॅफी म्हणजे प्रेम,
चहा एकदम झटपट,
काॅफी अक्षरश: निवांत,
चहा म्हणजे झकास,
काॅफी म्हणजे वाह! मस्त,
चहा म्हणजे कथासंग्रह,
काॅफी म्हणजे कादंबरी,
चहा नेहमी मंद दुपार नंतर.....,
काॅफी एक धुंद संध्याकाळी.....
चहा चिंब भिजल्यावर,
काॅफी ढग दाटून आल्यावर,
चहा म्हणजे उत्फुर्तता,
काॅफी म्हणजे उत्कटता,
चहा वर्तमानात दमल्यावर,
काॅफी भूतकाळात रमल्याावर.....
