चेहरा
चेहरा
1 min
288
चेहरा हा मनाचा आरसा असतो
प्रत्येक भावनेला अचूक दर्शवतो
पण हाच चेहरा कधीतरी फसवून जातो
चेहऱ्यावर हसू अन् मनात दुःख साठवून ठेवतो
नेहमीच खरे भाव दाखवेल चेहरा
या गोष्टीची काही शाश्वती नाही
म्हणूनच चेहऱ्यावरचे फक्त भाव वाचून
मनाच्या गाभाऱ्यात डोकावता येत नाही
मानव मन हे एक गूढ रहस्य आहे
खऱ्या अर्थाने भावनांचे सागर आहे
तरीही चेहऱ्यांना वाचायचा प्रयत्न जेव्हा होतो
अशा वेळी तो चेहरा मुखवटा धारण करतो .
