STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

चेहरा

चेहरा

1 min
11.5K

चेहरा कधीकधी सगळंच सांगतो

तर कधी सगळंच लपवतो

निखळ हास्यामागेही

दुःख चलाखीने दडवतो


भावनांचा अविष्कारही

लोकांना दाखवतो

भावना लपवण्याचा

आधारही तोच असतो


निःशब्द संवादाची

जागा भरून काढतो

शब्द सोडतात साथ

तेव्हा चेहराच साथी असतो


चेहऱ्याच्या लकेरीलाच

प्रत्येकजण सत्य समजतो

पण सत्य झाकण्याचा

हा पुरता प्रयत्न असतो


समोरचा प्रत्येक चेहरा

हा पारदर्शी नसतो

असा चेहरा वाचणाराच

जग चांगले ओळखतो


Rate this content
Log in