चौक !
चौक !
सगळ्याच गल्ल्या भेटतात इथे
डावी उजवी की पहिली दुसरी सगळ्याच
चौकात असतात वेगवेगळे भोंगे
ओरडतात बेंबीच्या देठापासून
काही विकतात अपलेच जिन्नस बोलुन खोटे
काही करतात अल्ला अल्ला
काही भजतात नाम श्रीरामाचे
कुठे ठहाके माजाचे
कुठे कारूण्य बसले पसरून झोळी
कुणी थिगळात लाज झाकते अबला नारी
कुणाची फॅशन समोर लज्जा उघडी
तऱ्हा अनेक जगण्याच्या चौकात दिसतिल
कुठे आज तुमचा तर कुठे गुजरलेला काल
कुठे उन्मंत तारूण्य तर कुठे जर्जर वानप्रस्थ
चौक ही खिडकी का सगळ्याच काळांची
स्थरांची ,वंशांंची ,भावनांची -----