चौदा मे(14)
चौदा मे(14)
1 min
11.3K
चौकशी करता समजलं
दार बंद चर्चा सुरू आहे
वाद विवादा नंतर म्हणे
दिमाखात आदेश निघणार आहे...!
वर करणी पेरणी कामाची
सगळी कागदावर होणार आहे
ढगा आडच खलबत पुन्हा
गावा गावात शिजणार आहे....!
आजचा दिनक्रम जरा
डमरू वाजवतच बाहेर पडणार आहे
चालू पणा करून कामांना आज मी
खरोखरच बुट्टी मारणार आहे....!
आळसाची मैत्री मद्दाम
आज मी करणार आहे
चहा घेताच सुरुवात रविवारची
पुन्हा पडी मारूनच करणार आहे...!