STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

चौदा एप्रिल सांज..!

चौदा एप्रिल सांज..!

1 min
11.9K

एकोणिसाव्या दिवसाची सांज ही..!

ए का एकी सारे घडले

को णास काही नाही कळले

नि सटून गेले दोन दिवस

सा धी गणना ही करणे नाही जमले...

व्या पच झाला या व्याधीची

दि नरात घरातच बसावे लागते

व जन वाढेल म्हणून भय वाटते

सा धे जेवण सुद्धा जड भासते...

चि टपाखराची सुद्धा योग्यता नाही

सां गायचं म्हणजे चालता येत नाही

ज रा उडता ही येत नाही तरी

ही याची मीजास डावलता पण येत नाही...

    दूर दूर राहणे,काळजी घेणे

    घरातच राहून याला हरवणे

    इतुकेच बाबांनो आपण करणे

    आणि सहीसलामत यातून पार पडणे...

    थोडे गम है धोंडी खुशीया है म्हणत

    येणारा दिवस आनंदात घालवू

    सारे मिळून एकजुटीने

    या संकटातून लीलया मुक्त होऊ...!


Rate this content
Log in