चैत्री पाडवा
चैत्री पाडवा
1 min
421
चैत्र पालवी फुटली
हिरवा शालू घालून अवनी नटली
गुलमोहर तो डवरला
वसंतऋतू तो सुरू जाहला
आंब्यालाही पिवळा मोहर आला
केशरी आंब्याचा सुगंध दरवळला मनी
विजय पताका घेउनी आला सीताराम धनी
गोरजमुहूर्त तो चैत्री पाडवा
सणाचा हा अधिक गोडवा
घरोघरी रंगरांगोळी, पताका, यशाची गुढी उभारू
श्रीरामाला वंदू, चरणस्पर्श करू
श्रीरामालाच स्मरू
ताव मारून खाऊ श्रीखंड, गरमागरम पुरी
मनी प्रार्थना पाडवा साजरा होउ दे घरोघरी ॥
