STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

चैत्र पालवी

चैत्र पालवी

1 min
193

नवेपणाची चाहुल, चैत्राच्या महिन्यात

चैत्र पालवी, फुटते रणरणत्या उन्हात

 कोवळी पाने वाढवी वृक्ष शोभा

डोंगर, दरी हिरवी , भरली वृक्ष सभा //१//


शिशिर सरला आणी वसंत बहरला

बहरला तो पळस, लाल रंग लेऊनी

करवंद बहरली, शाल काळी पांघरूनी

मधुगंध पिण्या भुंगे मग्न मनी होऊनी //२//


पानगळ सरली , आली चैत्र पालवी

रूप मनोहर , नटलेल्या सृष्टीचे गोड

एकाहून एक सरस एक, एक झाड

नवचैतन्य देणारी सृष्टी दिसते गोड //३//


कोवळी पाने, हिरव्या वेली सजल्या

जणु स्वागत, चैत्राचं करू लागल्या

डोंगर कुशीत नाही बरसला पाणी

आश्चर्य तरीही आली,नवसंजीवनी //४//


चैत्र पालवी अशीच फुलत राहो

मना, मनात नवचैतन्य घडत राहो

करतो यशाची सदा कामना

यश लाभो सर्वथा हीच ईश्वरचरणी प्रार्थना //५//



Rate this content
Log in