STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Others

2  

Dilip Yashwant Jane

Others

चैतन्य

चैतन्य

1 min
601

उधळीत चैतन्य फुलला वसंत

जागर झाला सृष्टीत सारा

फुले गोजिरी पहा तरूवरी

स्वागतास वसंताच्या आगळा नजारा


नसता ऋतू वर्षा तरिही

देई संजिवनी सृष्टीस वसंत

कोवळी हिरवी तांबूस पालवी

वनराई दिसे सारिच शोभिवंत


दूर माळरानी उभा पळस

पांघरून शाल लाल गुलाबी

सडा सभोवती शुष्क फुलांचा

दिसे वसंता वेगळीच छबी


ऋतूराज म्हणून करती गौरव

जगी सारेच ऋतू वसंताचे

कोकीळ गाते मधूर गाणे

शिंपडून सूर सृष्टीत अमृताचे


Rate this content
Log in