चातुर्मास
चातुर्मास

1 min

68
आषाढ घन पालटे सृष्टीचा कणकण
धरनीचे रूप देखून उल्लासते मन
झरझर सरी जोर धरी श्रावनातं
एकस्थानी व्रत करावे चातुर्मासात
मानवी मन अविरत उधळे चौखूर
वर्ज्यावर्ज्य घाली सात्विकतेत भर
धर्म पारायणे बोध करी पवित्रतेला
चातुर्मासी व्रते तारी तमोगुणाला
मते मतांतर विचार करी मनःस्पर्श
सत्य हे परंपरा जपून होतो उत्कर्ष