Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mala Malsamindr

Romance

2  

Mala Malsamindr

Romance

चारोळ्या

चारोळ्या

2 mins
3.0K


१) जिवलग


जिवलग माझा बनला मित्र

प्रेम करतो माझ्यावर अहोरात्र 

पाठवतो मला स्वतः बनवलेले चित्र

माझ्या जीवनामध्ये त्याने पसरवले अत्र.


२) प्रेम


जिवलगाच्या स्पर्शाने खूलून गेली मी मात्र 

झोपच येत नाही त्याच्या शिवाय रात्र रात्र

बाहेर जाताना देतो मला तो प्रेम पत्र

मग तो येईपर्यंत वाचते दिलेले प्रेम पत्र .


३) शीळक


माझा हा जिवलग

आहे इतरांपासून अलग

माझ्यावर प्रेम करतो सलग

प्रेम करतो माझ्यावरी मारतो शीळक.


४) सखा


 तूच आहेस जीवलग

 तूच आहे जोडीदार 

 तूच माझा सखा

 तूच आहेस जीवनाचा आधार.


५) माहेर


मी माझे माहेर सोडले 

आई-बाबांची सोडली आस

तुझा मिळाला प्रेमळ सहवास 

सख्यासोबत करायचा जीवनाचा प्रवास.


६) ओंजळ


सख्याने माझी सुखाने ओंजळ भरली 

मी त्याच्याकडे अलगद आकर्षली

तुझ्यामुळे माझी कूस ओलावली 

आणि प्रांजळ दोन आपत्य जन्मली.


७) सुगंध


माझ्या जीवनात सुगंध दरवळला

जिवलगाने माझ्या मनात प्रेमभाव फुलवला

कानांमध्ये माझ्या आय लव्ह यु शब्द सुखावला

प्रेमाचा माझ्यावर जणू पाऊस पडला.


८) दिवस


माझा रोजचा दिवस

जिवलगाच्या प्रेमाने उगवायचा 

आणि माझी रोजचीच रात्र 

जिवलगाच्या प्रेमाने मावळायची.


९) पावसाची सर


आली जिवलगाच्या प्रेमाच्या पावसाची सर 

जनू बरसत गेली अलगद माझ्यावर 

माझ्या कानात फिरतो तुझा मधुर स्वर 

आणि तुझं बनवायला तूच मला वर.


१०) गजरा


मी जीवलगाच्या प्रेमात नाच नाच नाचले 

आणि गजरा बनवायला फुले वेचले 

त्याच्या हाताने फूले केसांवर चढवले

त्याच्या गुलाबी स्पर्शाने रोम रोम महेकले.


११) प्रेमात पडले


जिवलगाला बघितले प्रेमात पडले 

तुझ्या चेहर्‍याला अशी भाळले

की तुझ्याशिवाय करमेना झाले 

आणि म्हणून मी तुलाच वरले.


१२) दुःख


जिवलगाच्या सहवासाने

मी दुःखाला चिरले 

एक एक दुःख सारले 

थोडेही नाही घाबरले.


१३) अर्थ


तू मिळाला जगण्याचा अर्थ कळला 

मनाला माझ्या धिरोसा मिळाला 

माझ्या मन मंदिराचा मोगरा फुलला 

आणि तुझ्यावर तो अतोनात बरसला.


१४) अबोल


प्रेमाची तुझी अबोल 

चाहूल मज लागली 

आणि मी तुला

नकळत रोजच भेटली.


१५) एकटी


त्यावेळेला होते मी एकटी

म्हणून मी तुझ्याशी एकटली

भावना दाटून आल्या उरी

खुलली मनामधली कळी.


१६) लहर


नजर माझी जनू खिळली

तुझ्या नजरेच्या तीरावरी

वाट बघत आहे मी बसूनी वाटेवरी

लाटांची लहर आली माझ्या अंगावरी.


१७) बहर


जीवनामध्ये आला असा बहर 

केला कळ्यांनी असा कहर 

उमटली अनोमाची जीवनात मोहर

तू दिले जीवन मजला हिरवेगार.


१८) प्रेमात


तू बघायला आला मी तुझ्या प्रेमात पडले 

तुझ्यावर जीव माझा हा निछावर करण्यास धजले

हळद लावून तुझी मला कांती माझी उजळली 

अंगठी मला घालून तू साक्षगंधची वेळ फुलवली .


१९) प्रिया


किस मागू नको प्रिया मिलनाची वेळ येऊ दे 

सर्वांच्या साक्षीनेआपला प्रेमविवाह होऊ दे 

वेळ गेली भरभर दिस प्रेमाचा उगवला 

मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला .


२०) सासर


माहेर सोडूनी मी तुझ्यासोबत सासर गाठलं 

सासर नाही हे माझे मी माहेरच मानलं 

तुझा स्पर्श होता मन अतिवेगाने धडधडले

तुझ्या ओठांच्या स्पर्शाने मी आतून थरथरले.


२१) गुंतला


कसं सांगू तुला रे मी जीव तुझ्यात गुंतला 

तुझ्या प्रेमासाठी माझा कणकण आतुरला 

तुझा श्वास फूलला नी माझ्या श्वासात मिसळला

तुझ्या मी माझ्या मिलनाचा जनु गुंता झाला .


२२) दुष्काळ संपला


आभाळ भरून भरून आले धरतीवर रीत झाले 

तिचे कोमाऱ्य जणू त्याने सहजतेने कुरवाळले 

कोरड्याफट्ट मातीत तू नांगर घातला

प्रमादाच्या आवेगाने माझा दुष्काळ संपला.


२३) ओलावा


तुझ्या प्रेमरूपी घोटाने ओलावा टिकवला

माझ्या फुललेल्या कुशीतून अनोमाचा जन्म झाला

उरी फुटून फुटून मी अनोमाला पान्हा पाजला

आपले प्रेमाचे बंधन मग अजूनच दृढ झाले.


२४) जीवन


चंद्र तार्‍यांच्या साक्षीने आपले एकांत घडले 

तू प्रेमामृत फवारले आयुष बाळ जन्मले

माझ्यावर आहे मला गर्व की तुला मी पसंत केले 

कृतज्ञता मानू का तुला माझे जीवन बहरले .


२५) देव


नतमस्तक होते तुला तुझ्या पायावर झुकते 

देव माहित नाही मला तुलाच देव मानते

उपकार मानते मैत्रिणी चमक हिऱ्याची तुज न गवसली

 एकच तो कोहिनूर हिरा चमक माझ्या गळा झळकली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance